गावातील विविध सुविधा

गावातील विविध सुविधा :

शैक्षणिक सुविधा :

गावामध्ये अंगणवाडी,प्राथमिक शाळेपर्यंत शिक्षणाची सोय आहे.

  • प्राथमिक शाळा – प्राथमिक विद्या मंदिर खानापूर, प्राथमिक विद्या मंदिर रायवाडा.
  • अंगणवाडी खानापूर, अंगणवाडी रायवाडा व मिनी अंगणवाडी कासारशेत.

दुध संस्था :

गावामध्ये कृषीपुरक जोडधंद्यांमध्ये दुग्धउत्पादन हा व्यवसाय असून खानापूर  गावामध्ये  दोन व  रायवाडा गावामध्ये दोन अशा एकूण चार दुध संस्था आहेत..

दूध संस्था व त्यांची नावे –

  • श्री. सोमेश्वर दुग्ध व्यावसायिक संस्था खानापूर.
  • श्री. महालक्ष्मी सहकारी दुग्ध  व्यावसायिक संस्था खानापूर.
  • श्री. राष्ट्राळ सहकारी दुग्ध संस्था रायवाडा.
  • श्री. विठ्ठल रखुमाई सहकारी दुग्ध संस्था रायवाडा.

महिला बचत गट :

महिलांचा विकास करण्यासाठी गावामध्ये पाच महिला बचत गट निर्माण केले असून त्यांमार्फत महिलांचे आर्थिक, सामाजिक सबलीकरण होत आहे. अनेक कुटुंबांना महिला बचत गटाचा आधार ठरत आहे.

  • च‌ाळोबा महिला बचत गट खानापूर.
  • गोकुळ महिला बचत गट खानापूर.
  • समृद्धी महिला बचत गट खानापूर.
  • महालक्ष्मी महिला बचत गट खानापूर.
  • सोमेश्वर महिला बचत गट खानापूर.
  • रेणुका महिला बचत गट खानापूर.
  • च‌ाळोबा महिला बचत गट रायवाडा.
  • जयभवानी महिला बचत गट खानापूर.
  • रवळनाथ महिला बचत गट खानापूर.
  • राष्ट्राळ महिला बचत गट खानापूर.

तरूण मंडळे :

तरुणांच्या शक्तीचा गावाच्या विकासासाठी उपयोग करुन घेण्यासाठी तरुण मंडळे स्थापन केली आहेत. यांमार्फत विविध सामाजिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रिडास्पर्धा आयोजित केल्या जातात.

 क्रांती तरुण मंडळ खानापूर.

सोमेश्वर तरुण तरुण मंडळ खानापूर.

 

 

वित्तिय संस्था :

ग्रामीण अर्थकारणाला चालना देण्यासाठी गावामध्ये कै. राजाराम गुरव  वि.का.स. सोसायटी, यांची स्थापना करण्यात आली आहे. या संस्था मार्फत गरजू सभासदांना कर्ज पुरवठा केला जातो. त्यामुळे त्याच्या आर्थिक विकास घडून येण्यास मदत होते.

वाचनालय : कै.सुभाषराव राणे वाचनालय खानापूर

गावातील मुला – मुलीना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी वाचनालयाची स्थापना केली आहे. वाचनालयामध्ये मुलांना स्पर्धा परीक्षेसाठी हवी असणारी पुस्तके, जनरल नॉलेजची पुस्तके व इतरही मटेरियल (साप्ताहिके,मासिके) उपलब्ध करून दिले जाते.

व्यायामशाळा : जय हनुमान व्यायाम शाळा खानापूर व ओपन जिमची सुविधा आहे

मुलांना शिक्षणाबरोबरच व्यायामाची हि सवय असावी यासाठी गावामध्ये व्यायाम शाळा काढली आहे. .

गावाचा प्रमुख व्यवसाय हा कृषी, कृषीपुरक जोडधंदे व इतर लहान मोठ्या घरगुती व्यवसायाशी निगडीत आहे. 

प्रमुख पिके म्हणून ऊस, भात, नाचना, भुईमूग, सोयाबीन तसेच आधुनिक पद्धतीने फुल शेती, स्ट्रोबेरी, झुकेनी यांचे उत्पादन घेतले जाते. तर सिंचनासाठी गावाला लघु तलाव, विहीर व नदीचा आधार आहे.

गावातील मंदिरे :

गावाचे ग्रामदैवत सोमेश्वर व राष्ट्राळ ही मंदिरे आहेत. दरवर्षी श्री सोमेश्वर देवाची यात्रा उत्साहात साजरी केली जाते. गावामध्ये विठ्ठल रखुमाई मंदिर ही आहे.

Loading

× Chat Here