खानापूर ग्रामपंचायत ..

ग्रामपंचायत खानापूर

मौजे खानापूर हे गाव आजरा येथून ६ कि.मी. अंतरावर असून खानापूर गावाची लोकसंख्या ७८१ इतकी आहे .सदर ग्रामपंचायत खानापूर अंतर्गत खानापूर,रायावाडा व कासारशेत या तीन वस्त्या आहेत .खानापूर गावाचे आराध्य दैवत श्री सोमेश्वर देव आहे .तर रायवाडा गावाचे आराध्य दैवत श्री राष्ट्राळ देव हे आहे .खानापूर  ग्रामपंचायत अंतर्गत दोन प्राथमिक शाळा , ३ अंगणवाडी , ४ दूध संस्था असून खानापूर गावालगत पाटबंधारे विभागाचे लघु तलाव आहे .खानापूर हे गाव नैसर्गिक दृष्ट्या सधन असून गावाच्या चारही बाजूने मोठमोठी वृक्ष आहेत .खानापूर गावापासून ५ कि मी अंतरावर चित्री प्रकल्प हे पर्यटन स्थळ आहे .

सौ. डोंगरे कल्पना रामचंद्र

सरपंच

श्री. राणे आनंदा दत्तू

उपसरपंच 

श्री. दुंडगेकर विशाल शिवाजी

ग्रामसेवक 

ग्रामपंचायतीने वैशिष्ट्यपूर्ण राबविलेल्या योजना ..

  • ग्रामस्वच्छता अभियान
  • निर्मल ग्रामयोजना
  • यशवंत ग्राम समृद्धी योजना
  • राष्ट्रीय पेयजल योजना
  • जलजीवन मिशन

ग्रामपंचायतीस मिळालेले विविध पुरस्कार ..

प्राप्त पुरस्कार
निर्मल ग्राम पुरस्कार
महात्मा गांधी तंटामुक्त गाव पुरस्कार
पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम पुरस्कार

पंचायत समिती आजरा

आजरा पंचायत समिती ही तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासाचे कार्य करीत आहे. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे संकेतस्थळ कार्यान्वीत करतांना डिजिटल इंडियाचा मुख्य हेतू प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. विविध योजना व त्याची परिपूर्ण माहिती तसेच विविध विभागांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यांत आली आहे. योजनाविषयक माहितीचा समाजातील प्रगत घटकाबरोबरच समाजातील दुर्बल व शेवटच्या घटकापर्यंत मिळण्यास मदत होईल.

Loading

× Chat Here